S M L

आडत बंदीचा तिढा कायम, बैठक फिस्कटली

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2015 03:26 PM IST

आडत बंदीचा तिढा कायम, बैठक फिस्कटली

aadat_patil_15 जानेवारी : आडत बंदीबाबत मुंबईत बैठक पार पडली पण कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे ही बैठक फिस्कटलीये. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, व्यापारी आणि शेतकर्‍यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. पण शेतकरी संघटनेचे नेते बैठकीतून बाहेर पडले.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आडत बंदीविरोधात व्यापार्‍यांनी बंदचं हत्यार उपसल्याने राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली होती. शेतकर्‍यांच्या हितासाठी कृषी उत्पन्नबाजार समित्यांमध्ये वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं त्यानंतर तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुंबईत बैठक पार पडली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आडत व्यापार्‍यांनी सरकारला मॅनेज केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. आडत रद्द करण्यासाठी सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. दुसरीकडे आडत बंद झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close