S M L

साखर कारखान्यांना केंद्राने मदत द्यावी-शरद पवार

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2015 06:22 PM IST

sharadpawar-kc8F--621x414@LiveMint15 जानेवारी : ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम देणं शक्य नसलेल्या साखर कारखान्यांना केंद्र सरकारनं आर्थिक मदत करायला हवी, या मागणीचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनरुच्चार केलाय. तसंच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रती टन 600 ते 700 रूपये मदत दिली पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलनं केली होती. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात साखर संकुलाची तोडफोड केली होती. राज्य सरकारनेही ऊस दरवाढीसाठी एफआरपीच्या मागणीसाठी केंद्राकडे मदत मागणार असं आश्वासनं दिलंय. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्य सरकार आणि स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा समाचार घेतला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सरकारला धारेवर धरत स्वाभिमानी संघटनेवर टीका केली. शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या मेहनतीच्या पैशातून साखर संकुल उभारण्यात आलंय. पण त्याच साखर संकुलाची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही दुर्देवी आहे, आंदोलन हे योग्य मार्गानेच असायला पाहिजे अशी टीका पवारांनी केली. तसंच एफआरपी देण्याची मागणी रास्त आहे पण एफआरपीची रक्कम कारखान्यांना देणं जमत नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारने आर्थिक मदत करायला हवी असा सल्लाही पवारांनी दिला.आम्ही जेव्हा एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला तेव्हा टीका होत होती अशी आठवण करून देत राज्य सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढवा. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रती टन 600 ते 700 रूपये मदत दिली पाहिजे. आज ऊस उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून सरकारनं पूर्ण ताकदीनं शेतकर्‍यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणीही पवारांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close