S M L

आयसिसकडून मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 16, 2015 02:09 PM IST

आयसिसकडून मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

16 जानेवारी : मुंबईतील डोमेस्टिक एअरपोर्टच्या वॉशरूमच्या भिंतीवर अतिरेकी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. इस्लामिक स्टेट (आयसिस) संघटनेने मुंबईवर येत्या 26 जानेवारीला एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

डोमेस्टिक एअरपोर्टच्या टॉयलेटमधल्या भिंतीवर आयसिसच्या नावाने विमानतळ उडवून देण्याची धमकी लिहिण्यात आलेली आहे. या धमकीमध्ये 26 जानेवारीच्या दिवशी विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधीही 10 जानेवारी रोजी विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी 25 जानेवारीला येत आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ओबामा प्रमुख अतिथी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येण्याची पहिलीच वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरक्षा यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close