S M L

विखेपाटलांविरुद्ध ओबीसी समितीने केला लाक्षणिक संप

27 ऑगस्टमुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठांतर्गत सरकारी वकीलांच्या नियुक्त्यांमध्ये राज्याचे विधी आणि न्यायमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यानी नियमबाह्य नियुक्या केल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समितीनं केला होता. याविरोधात गुरुवारी वकीलांनी औरंगाबाद खंडपीठा समोर लाक्षणिक उपोषण सुरु केला. 32 सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांमध्ये मंत्र्यांनी स्वत:च्या नातेवाईकांसाठी आरक्षणाच्या जागांवर कुर्‍हाड घातल्याचा वकीलाचा आरोप आहे. 52 टक्के आरक्षणाचं तत्त्व लागू करेपर्यंत आणि शासनाचा योग्य तो निर्णय होईपर्यंत नियुक्त्या स्थगित ठेवण्याचा निर्णय 16 जुलै रोजी उपमुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये झाला होता. मात्र त्याचंही पालन करण्यात आलं नाही, असाही आक्षेप या वकिलांनी घेतला.समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेलं नाही. तसंच अतिरिक्त सरकारी वकीलाच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले नसतांनाही तीन अतिरिक्त सरकारी वकीलांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2009 01:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2009 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close