S M L

मालाड इमारतीतलं अग्नितांडव थांबलं, जीवितहानी नाही

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2015 02:40 PM IST

मालाड इमारतीतलं अग्नितांडव थांबलं, जीवितहानी नाही

malad17 जानेवारी : मालाडमध्ये कुरार व्हिलेजमध्ये शुक्रवारी रात्री एका 37 मजली इमारतीला आग लागली होती. अखेर 5 ते 6 तासांनंतर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाल यश आलंय. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

मालाडमध्ये कुरार व्हिलेज येथील अल्टा माऊंट या 37 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी रात्री या इमारतीच्या 37 व्या मजल्याला आग लागली. 37 व्या मजल्यावर लागलेली आग इमारतीच्या 17 मजल्यावर पोहचली. या आगीत 3 मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने बांधकाम सुरू असल्यामुळे इमारतीत कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. संक्रांतीला सोडण्यात येणार्‍या दिव्याच्या चायनीज कंदिलामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज फायर ब्रिगेडनं व्यक्त केलाय. ही आग इतकी मोठी होती की, आग विझवायला अग्निशमन दलाला 5 ते 6 तास लागले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी, पुन्हा एकदा मुंबईतल्या उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2015 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close