S M L

बीडमध्ये मुकादमाचा कळस, ऊसतोडणी कामगाराच्या मुलीवर अमानुष अत्याचार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2015 08:31 PM IST

बीडमध्ये मुकादमाचा कळस, ऊसतोडणी कामगाराच्या मुलीवर अमानुष अत्याचार

18 जानेवारी : ऊसतोड कामगाराने काम केले नाही म्हणून मुकादमाने त्या कामगाराच्या 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. बलात्कारानंतर नराधम मुकादमाने त्या पीडित मुलीच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले असून या अमानुष घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.

मध्य प्रदेशमधील ऊसतोडणी करणारे कुटुंब बीड जिल्ह्यात ऊसतोडणीच्या कामासाठी आले होते. महादेव भागवत नामक मुकादमकडे ते काम करत होते. या कुटुंबाने काम केले नाही म्हणून मुकादम महादेव भागवतने त्यांना पाच दिवस डांबून ठेवले. तसेच त्या कामगाराच्या 17 वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचारही केले. या प्रकरणाची माहिती गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या कामगारांची सुटका केली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close