S M L

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2015 03:03 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश

18 जानेवारी :  ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला यांनी आज सकाळी कोल्हापूरमध्ये निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.

चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या कालखंडात स्त्रियांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रतिकूल व आव्हानात्मक वातावरण असताना बेबी शकुंतला यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तारामती, बच्चोंका खेल, अबोली, शारदा, मायबहिणी, अखेर जमलं, मी दारू सोडली, पिया मिलन, छत्रपती शिवाजी, बिराज बहू, फरेब अशा चित्रपटातील त्यांच्या भुमिका लक्षणीय ठरल्या.

भालजी पेंढारकर, बिमल रॉय, अनंत माने, बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासाशी जोडणारा एक मोलाचा दुवाच हरपला आहे.

अभिनेत्री बेबी शकुंतला यांच्या निधनामुळे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या प्रारंभीच्या ऐतिहासिक वाटचालीचा महत्वाचा साक्षीदार असणारी अभिनेत्री गमावली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close