S M L

एजंट म्हणजे काय रे भाऊ? - दिवाकर रावते

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2015 11:05 AM IST

एजंट म्हणजे काय रे भाऊ? - दिवाकर रावते

19  जानेवारी :  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओतील एजंट हद्दपारीची ग्वाही दिली असताना आणि परिवहन आयुक्तांनी त्याबाबत नुकताच आदेश काढला असतानाही परिवहन मंत्री दिवाकर रावते हे मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहेत. आरटीओ एजंटमुक्त कधी होणार, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर 'एजंट म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यासोबतच 'एजंटची व्याख्या व्यापक आहे,' असे विधान त्यांनी केले.

परिवहन खात्याचे सचिव महेश झगडे यांनी नुकतेच राज्यातील आरटिओ ऑफिसेस एंजटमुक्त करण्याचे आदेश दिले होते. ही मुदत उलटल्यानंतरही एंजटचा सुळसुळसाट सुरू आहे. याबाबत दिवाकर रावते यांना विचारलं असता, त्यांनी एंजट कुणाला म्हणायचं असा प्रतिसवाल करत, पत्रकारसुध्दा ओळखीच्या लोकांची कामं पैसे न घेता करत असतात. मग तुम्हालाही एजंट म्हणायचे का?' असं म्हणत त्यांनी एजंट हद्दपारीच्या धोरणाची खिल्ली उडवली.

रावते यांनी रविवारी पुण्यात वाहतुकीशी संबंधित विविध संघटना आणि अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही विधाने केली. आरटीओ कार्यालये सुसज्ज करण्याबरोबरच तेथील दलालांचा सुळसुळाट दूर करण्याची घोषणा गडकरी यांनी केली होती. तर परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी तीनच दिवसांपूर्वीच सर्व आरटीओ कार्यालयांतून एजंट हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर रावते यांना प्रश्न विचारला गेला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close