S M L

बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट नामांतरण होणार !

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2015 05:15 PM IST

dg55mumbai_High-Court19 जानेवारी : बॉम्बे हायकोर्टाचं नामांतरण मुंबई हायकोर्ट करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतेय. याबाबत राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवलाय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.

14 ऑगस्ट 1862 साली अस्तित्वात आलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत तीन औरंगाबाद, नागपूर आणि गोवा खंडपीठ येतात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव-दमण आणि दादर आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या क्षेत्रात येतात.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात केवळ सुप्रीम कोर्टात दाद मागता येतेय. मद्रास आणि बॉम्बे हायकोर्टाच्या नामांतरण करण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर केंद्राची मोहर उमटल्यानंतरच बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई हायकोर्ट असं होईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close