S M L

वडापावच्या गाडीसाठी सख्ख्या भावाची हत्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2015 10:08 AM IST

वडापावच्या गाडीसाठी सख्ख्या भावाची हत्या

20 जानेवारी :  वडिलांची असलेली वडापावची गाडी आपल्यालाच मिळावी यासाठी मोठ्या भावाने चक्क आपल्या लहान भावाची हत्या केल्याची घटना नवी मुंबईच घडली आहे.  मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही घटना घडली असून आरोपी अमित पाटीलला अटक करण्यात आली आहे.

विशाल पाटील आणि त्याचा मोठा भाऊ अमित पाटील हे कोमोठे येथे वेगवेगळ्या ठिकाणी रहात होते. त्यांच्या वडिलांचा मस्जिद बंदरला वडापाव, चॅयनिजचा फूड स्टॉल आहे. वडापावची गाडी आपल्याला मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. अमित पाटीलने हा फूड स्टॉल आपल्याला मिळावा यासाठी तगादा लावला होता. पण अमित पाटीलचा लहान भाऊ विशाल पाटीलची यातील कोणताच स्टॉल अमितला द्यायची तयारी नव्हती. त्यामुळे आपल्याला काहीच मिळत नसल्याचे पाहून अमित पाटीलने आपल्या लहान भाऊ विशालचा काटा काढण्याने ठरवले होते. त्यानुसार मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर विशाल आला असता अमितने धारदार चाकूने त्याच्या छातीत वार केले. यात विशाल गंभीर जखमी झाला, त्याला एमजीएम रूग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close