S M L

विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यानं सदाभाऊ खोत नाराज

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2015 02:08 PM IST

विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्यानं सदाभाऊ खोत नाराज

20 जानेवारी :  विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याने सदाभाऊ खोत नाराज झाले आहेत त्यामुळे महायुतीत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपकडून स्मिता वाघ तर मित्रपक्षांतून महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना संधी देण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याने सदाभाऊ खोत नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ऊसदर आंदोलन चांगलंच पेटलं होतं. या प्रकरणी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना अटकही करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या अंदोलनाचाच फटका बसल्याचे बोलले जाते. आता सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत विचार करावा लागेल असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. यावर फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपकडून माधव भांडारी आणि शायना एन सी यांची नावं चर्चेत होती. पण भाजपने स्मिता वाघ यांना संधी देत अनपेक्षित धक्का दिला आहे. तर काँग्रेस उमेदवार उभा करणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close