S M L

एजंट्सचे धाबे दणाणले, सरकारविरोधात रस्त्यावर उतरले

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2015 07:11 PM IST

एजंट्सचे धाबे दणाणले, सरकारविरोधात रस्त्यावर उतरले

rto_officer23420 जानेवारी : आरटीओ एजंट्सवर कारवाई होणार असल्यानं आता एजंट्सचे धाबे चांगलेच दणाणले असून राज्यभरात ठिकठिकाणी एजंट्स आंदोलन करत आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये एजंट्स रस्त्यावर उतरले असून कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर औरंगाबादमध्ये तर एजंट्सनी गाशा गुंडाळल्यामुळे आरटीओ कार्यालयाने मोकळा श्वास घेतलाय.

पुण्यात बेमूदत कामबंद आंदोलन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंट्सनी आजपासून बेमूदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. आरटीओ कार्यालयातून ऐजंट्सना काढून टाकण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दिला होता. महेश झगडे यांच्या या आदेशा विरोधात आरटीओ एजंट्सनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे राज्यातील हजारो एजंट्सवर उपासमारीची वेळ ओढावेल असं एजंट संघटनेच म्हणणं आहे. आरटीओ कार्यालयातील एजंट्सना शासनाने अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी पुणे एजंट संघटनेने केली आहे.

आरटीओ कार्यालयाने घेतला मोकळा श्वास

तर, आरटीओ कार्यालयात एजंटबंदीची अंमलबजावणी औरंगाबादमध्ये कालपासून लागू करण्यात आली. एरवी एजंटमुळं गजबजलेलं आरटीओ आज मोकळं वाटत होतं. आरटीओ परिसरात एजंट दिसू नयेत म्हणून आरटीओ कार्यालयाने पोलीस आयुक्त आणि ऍन्टी करप्शन ब्युरोला पत्र पाठवून कारवाईची विनंती केलीय. एजंट्सच्या कार्यालयाबाहेर असलेल्या टपर्‍याही काढण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलंय. एजंटबंदीची अंमलबजावणी औरंगाबादमध्ये कडकपणे राबवण्यात येत आहे. आणि एजंटबंदीमुळे कसलंही नुकसान होत नसल्याचं आरटीओ आधिकार्‍यांनी सांगितलं आहे. एजंटच्या संघटनेनं मात्र हा अन्याय असल्याचा दावा केलाय.

सर्वपक्षीय नेतेही आले धावून !

राज्यातल्या आरटीओ ऑफिस परिसरातल्या एजंटांवरील कारवाईविरोधात नागपुरात सर्वपक्षीय परिवहन सेलच्या नेत्यांनी एजंट्ससह आंदोलन केलं. रिझर्व्ह बँक चौकात झालेल्या आंदोलनात परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या विरोधात एजंटांनी घोषणाबाजीही केली. सरकारने आरटीओ एजंटांना नियमित करावे अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close