S M L

बिनविरोध निवडणूक; वाघ, जानकर आणि मेटे विधानपरिषदेवर

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2015 09:30 PM IST

बिनविरोध निवडणूक; वाघ, जानकर आणि मेटे विधानपरिषदेवर

vidhan_parishad_bjp20 जानेवारी : विधानपरिषदेच्या चार जागांसाठीची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे हे आता निश्चित झालंय. शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून स्मिता वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे चारही उमेदवार विधानपरिषदेवर गेले आहे.

भाजपने आपल्या मित्रपक्षांना विधानपरिषदेचं तिकीट दिलंय. मात्र, या तिकीटावरुन नाराजीनाट्य घडले. भाजपकडून स्मिता वाघ यांचं नाव समोर आल्यानंतर माधव भंडारी यांचा पत्ता कट झाला. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला सारण्यात आलं. सदाभाऊ खोत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, ज्या उमेदवारांची नाव जाहीर झाली. त्या चारही उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे विनायक मेटे आणि महादेव जानकर यांनी यावेळी भाजपच्याच कोट्यातून आपले उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे ते भाजपचे आमदार म्हणून विधान परिषदेत असणार आहेत. यामुळे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ तीननं वाढणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते आहे.

कोण आहेत स्मिता वाघ ?

- अमळनेर तालुक्यातील रहिवासी

- शालेय जीवनापासून अभाविपची सक्रिय कार्यकर्ती

- जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा

- भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा

- एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 09:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close