S M L

'खाप' पंचायत; भजन लोकप्रिय झाले म्हणून 15 वर्षांपासून कुटुंब वाळीत

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 04:32 PM IST

'खाप' पंचायत; भजन लोकप्रिय झाले म्हणून 15 वर्षांपासून कुटुंब वाळीत

jaat_panchyat_dapoli21 जानेवारी : गणपती उत्सवादरम्यान भजन लोकप्रिय झाले म्हणून जात पंचायतीने एका कुटुंबाला गेल्या 15 वर्षांपासून वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना उजेडात आलीये. विशेष म्हणजे रायगडपाठोपाठ रत्नागिरीत ही घटना घडलीये. जात पंचायतीचे पंच एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या कुटुंबाशी गावकर्‍यांना संबंध ठेवण्यास मनाई केलीये.

रत्नागिरीत जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या लोणवडी इथल्या रांगले कुंटुंबाला गेल्या 15 वर्षांपासून वाळीत टाकण्यात आलंय आणि यासाठी अगदी किरकोळ कारण घडलंय. गणपती उत्सवादरम्यान गावात एक भजन असताना दुसरे भजन तयार केले ते भजन लोकप्रिय ठरले म्हणून गावात पंचायत बसली. जात पंचयतीने मोहन रांगले यांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. तसंच 500 रूपये दंड ठोठावण्यात आला होता. 15 वर्षांपूर्वी ठोठावण्यात आलेला दंड व्याजासह भरण्याचा तगदा पंचायतीने लावला. जात पंचायतीच्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटं आली. मानसिक दडपण येऊन आत्महत्या करण्याच्या हेतूने गेले 6 महिने ते घर सोडून गेले होते. वाळीत कुटुंबाकडे कोणी जायचं नाही, रोटी-बेटी व्यवहारही करायचा नाही असा नियम या गावात करण्यात आला. मोहन रांगले यांच्या मुलाला मुलगी दिल्यानं मुलीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आल्यानं रायगड जिल्ह्यातील पेण इथं नोंदणी पद्धतीने लपून विवाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली. एवढंच नाहीतर जात पंचायतीच्या भीतीने मुलीचे वडिल कन्यादानालाही गेले नव्हते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close