S M L

राष्ट्रवादीनेच घेतली गणेश नाईकांशी फारकत

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 07:03 PM IST

Ganesh naik21 जानेवारी : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना पक्षाने झटका दिलाय. राष्ट्रवादीने 20 नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी सोपावली आहे पण गणेश नाईक यांना मात्र वगळण्यात आलंय. त्यांच्या ऐवजी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय. एका प्रकारे राष्ट्रवादीने नाईकांची हकालपट्टी केल्याची चर्चा सुरू झालीये.

राष्ट्रवादीने आज अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, मधुकर पिचड, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, सुरेश धेस, मनोहर नाईक, यांच्यासह 20 नेत्यांवर जिल्हावार पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पण गणेश नाईकांना वगळलंय. गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक आणि राष्ट्रवादीमध्ये बेबनाव असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गणेश नाईक आणि त्यांचं कुटुंबीय राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. तसंच ते भाजपच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुकाजवळ आल्या असतानासुद्धा नाईक कुटुंबीयांवर पक्षानं विश्वास दाखवलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनेच गणेश नाईक यांच्याशी फारकत घेतलीय, असं बोललं जातंय. दरम्यान, पक्षात जे सक्रिय आहेत त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जे नाहीत त्यांना जबाबदारी देण्यात आलेली नाही. अशी सुचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close