S M L

अकोले दरोडा-सामूहिक बलात्कार प्रकरणी 6 आरोपी निर्दोष सुटले

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 07:09 PM IST

अकोले दरोडा-सामूहिक बलात्कार प्रकरणी 6 आरोपी निर्दोष सुटले

akole563421 जानेवारी : अख्खा महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या अकोले दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी सहाही नराधम आरोपी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे निर्दोष मुक्त झाले आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (बुधवारी) संगमनेर कोर्टात झाली. पण या प्रकरणातल्या सहा आरोपींना सबळ पुराव्यांअभावी सोडून देण्यात आलं.

जुलै 2011मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या विरगाव इथल्या वस्तीवर दरोडा पडला होता. सहा ते सात दरोडेखोरांच्या टोळक्याने दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलांवर अमानुष अत्याचार केले होते. दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार केला होता तर विरोध करणार्‍या चार वृद्ध महिलांना जबर मारहाण केली होती. संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्यातील सगळ्या नेत्यांनी अत्याचारीत कुटुंबाचे सांत्वन केले आणि पोलिसांना लवकरात लवकर आरोपी अटक करण्याचा दबाव वाढवला. पोलिसांनी सहा आरोपींना आठ दिवसानंतर अटक केली. हे तेच आरोपी आहेत का? असा प्रश्न त्याही वेळी उपस्थित झाला होता आणि आता त्यांना सबळ पुराव्यांअभावी संगमनेर कोर्टाने निर्दोष मुक्त केलंय. त्यामुळे पोलिसांनी केवळ वेळ मारून नेण्यासाठी आरोपी पकडले असल्याचा आरोप होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close