S M L

राजकारण घाणरेडं, काही बोलायचं आणि उतरायचंही नाही -अण्णा

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 08:43 PM IST

राजकारण घाणरेडं, काही बोलायचं आणि उतरायचंही नाही -अण्णा

anna_on_polt21 जानेवारी : राजकारण हे घाणरेडं आहे, त्यामुळे आपल्याला त्यावर काही बोलायचं नाही आणि त्यात उतरायचंही नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावर मीडियाच्या प्रतिनिधींनी अण्णांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण अण्णांनी यावर बोलण्याचं टाळलं.

भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांनी जनलोकपाल आंदोलन केलं होतं. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी अण्णांच्या खांद्याला खांदा देऊन आंदोलनात सहभागी झाले होते. नुसते सहभागी नव्हते तर दोघांनीही मुख्य सदस्यांची भूमिका पार पाडली होती.

अण्णांच्या आंदोलनाच्या अखेरीस केजरीवाल यांनी पक्ष काढण्याची घोषणा केली आणि आंदोलनातून बाहेर पडले. मात्र अण्णांनी राजकारणात उतरणार नाही असं ठामपण बजावतं केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्यात.

केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन केल्यानंतर अण्णांनी राळेगणमध्येच उपोषण केलं होतं. त्यावेळी किरण बेदी अण्णांच्या सोबतच होत्या. आता किरण बेदी यांनी राजकीय आखाड्यात उडी घेतलीये. बेदी आणि केजरीवाल एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे. यावर अण्णांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. अण्णांनी पत्रकारांना दारातच रोखलं आणि आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली. राजकारण हे घाणरेडं आहे. यावर आपल्याला काहीही बोलायचं नाही आणि अशा राजकारणात उतरायचंही नाही असं सांगत अण्णांनी एकाप्रकारे बेदींच्या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 08:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close