S M L

मुनगंटीवार यांचं कुठे स्वागत तर कुठे काळे झेंडे !

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 10:43 PM IST

मुनगंटीवार यांचं कुठे स्वागत तर कुठे काळे झेंडे !

mungantiwar_welcome21 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरमध्ये दाखल झाले. चंद्रपुरात दाखल होताचं एकीकडे त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं तर कुठे काळे झेंडे दाखवण्यात आले.

दारुबंदीच्या निर्णयाने संतापलेल्या दारू विक्रेत्यांनी मुनगंटीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तर जटपुरागेटजवळ झालेल्या सभेत महिलांनी पुष्पगुच्छ आणि हार यांनी मुनगंटीवारांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे काही मद्यपींनीही त्यांचं स्वागत केलं.

एवढंच नाहीतर दारू बंदीच्या निर्णयाचं स्वागत स्थानिक प्रहार संघटनेनं बिअर बारसमोर दूध वाटून केलं. दूध वाटप उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री आणि दारू बंदीसाठी आग्रही असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

दरम्यान, चंद्रपुरातल्या दारू विक्रेत्यांच्या लॉबीला घाबरत नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्यात कठोरपणे दारूबंदी राबवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 10:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close