S M L

'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये मुख्यमंत्री सहभागी

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2015 11:43 PM IST

'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये मुख्यमंत्री सहभागी

21 जानेवारी : स्वीत्झर्लंडमधल्या डाव्होस इथं सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. आज त्यांनी वेगवेगळ्या उद्योग आणि आर्थिक समुहांच्या प्रमुखांशी चर्चा केली. राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी उद्योग समुहांचं सहकार्य घेण्यासंदर्भात ही चर्चा झाली. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी डाव्होसला रवाना होण्यापूर्वी IBN लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं होतं. पहिल्या सत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी नोमुरा या आघाडीच्या ब्रोकरेज संस्थेचे अध्यक्ष मिनोरू शिनोहारा तसेच या समुहाचे भारतातले सीईओ विकास शर्मा यांच्याशी चर्चा केली. मुंबईतल्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तसंच राज्यातल्या विकसित होणार्‍या शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या समुहाचे सहकार्य घेण्याबाबत फडणवीस यांनी चाचपणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री जनरल इलेक्ट्रीक, नेस्ले, पेप्सीको, लॉरीयल, इस्पात,शा अनेक उद्योग समुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 11:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close