S M L

ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2015 02:58 PM IST

gvf655mumbai_local

22 जानेवारी : मध्य रेल्वेचे रडगाणे अजूनही सुरूच असून ठाणे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती. यार्डातून लोकल काढताना ओव्हरडेह वायर तुटल्याने कल्याणच्या दिशेने जाणार्‍या धीम्या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. याचा परिणाम सीएसटीकडे जाणार्‍या गाड्यांवरही झाला असून स्लो आणि फास्ट, दोन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. गेल्या बर्‍याच दिवसांपासून मध्य रेल्वेची सेवा सातत्याने विस्कळीत होत असून त्याचा त्रास कामावर निघालेल्या चाकरमान्यांना सहन करावा लागला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2015 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close