S M L

पर्यावरण मंत्र्यांची केली अधिकार्‍यांची कानउघडणी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2015 01:19 PM IST

पर्यावरण मंत्र्यांची केली अधिकार्‍यांची कानउघडणी

22  जानेवारी :  सत्ताधारी मंत्र्यामध्ये सध्या अरेरावी करण्याची जणू स्पर्धाच रंगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दमदाटीनंतर आता पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटेंनीही कदमांनी पाडलेला पायंडा सुरू ठेवला आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात हिरवा पाऊस पडून आता वर्ष होत आले पण या भागातलं प्रदूषण कमी करण्यात पर्यावरण विभागाला अपयश आलं आहे. यावरूनच पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी काल (बुधवारी) कल्याण-डोंबिवली भागातल्या प्रदूषणाची पाहणी केली. पाहणीनंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी कामात कुचराई केल्याचं पोटेंच्या निदर्शनास आलं आणि ते प्रचंड संतापले. एवढं प्रदूषण तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताहेत, अशा शब्दात त्यांनी अधिकार्‍यांची कानउघडणी केली. तुम्ही सरकारचा पगार घेता तेव्हा जबाबदारी समजून घ्या, असा इशाराही अधिकार्‍यांना दिला.

काही दिवसांपूर्वी मिठी नदीच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदमांनीही अधिकार कक्षेत नसलेल्या अधिकार्‍यांना दमदाटी केली होती. त्यामुळे आता कॅबिनेट मंत्र्यांच्या पावलांवरच आता राज्यमंत्र्यांचेही पाऊल पडताना दिसत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2015 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close