S M L

पाकिस्तान सरकारनं घातली 'जमात-उद-दावा'वर बंदी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2015 02:59 PM IST

पाकिस्तान सरकारनं घातली 'जमात-उद-दावा'वर बंदी

22  जानेवारी :  पाकिस्तान सरकारनं जमात-उद-दावा या संघटनेवर बंदी घातली आहे. जमात-उद-दावाचा 2008 मधल्या मुंबई हल्ल्यात सहभाग होता. हाफिज सईद जमात-उद-दावाचा म्होरक्या आहे. जमात-उद-दावासोबतच पाक सरकारनं हक्कानी बंधूंवरही बंदी घातली आहे. दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याच्या आरोपावरून ही बंदी घालण्यात आली आहे.

जमात-उद-दावा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवर अखेर आज पाकिस्तानी सरकारने बंदी घातल्याचा घोषणा केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी नुकत्याच केलेल्या पाकिस्तानी दौर्‍यामध्ये दहशतवादी संघटनांमध्ये कोणताही फरक न करता त्यांच्यावर बंदी लादण्याचे आवाहन केले होते.

पाकमधील पेशावर येथील सैनिकी शाळेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शेकडो लहान मुले ठार झाल्यानंतर पाकिस्तानी सरकारने दहशतवादी संघटनांवर मोठ्या कारवाईस प्रारंभ केला आहे. या पाश्‍र्वभूमीवर हक्कानी नेटवर्क व जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याच्या आरोपावरून ही बंदी घालण्यात आली आहे.

2008 मधल्या मुंबई हल्ल्यात जमात-उद-दावाचा सहभाग होता. हाफिज सईद हा जमात-उद-दावाचा म्होरक्या आहे. जमात-उद-दावासोबतच पाक सरकारने हक्कांनी बंधूंवरही बंदी घातली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2015 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close