S M L

नगराध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2015 02:50 PM IST

nagar rape23 जानेवारी : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मनमाड शहरातसमोर आली असून या प्रकरणी मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. मात्र पाटील यांनी पीडित मुलीने केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे

मनमाड शहरातील एका भागातील 16 वर्षांच्या मुलीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह त्यांच्या दोन साथिदारांनी आपल्याला फसवून नेऊन अत्याचार केल्याचं तक्रारदार पीडित मुलीचं म्हणणं आहे. या प्रकरणी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप न्यायालयासमोर केल्यानंतर न्यायालयाने या घटनेची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिले. या प्रकरणी नगराध्यक्षांच्या विरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. मात्र, सदर आरोप खोटे आणि बिनबुडाचे असून माझे राजकीय अस्तित्व संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांचं म्हणणं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी राजकीय डाव आखण्यात आल्याचे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी व्यक्त केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2015 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close