S M L

युतीत 'गृह'कलह, कदम-खडसेंमध्ये जुंपली

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2015 08:15 PM IST

युतीत 'गृह'कलह, कदम-खडसेंमध्ये जुंपली

23 जानेवारी : शिवसेना आणि भाजपचा संसार पुन्हा एकदा नव्याने थाटला खरा पण गृहकलह आणखीही सुरू आहे. 'बाळकडू' सिनेमातल्या डायलॉगचा आधार घेत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये. मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेऊ नये आणि मराठी माणसांना मुंबईत स्वस्तात घरं द्यावी असा टोला कदम यांनी लगावलाय. तर कदम यांचं वक्तव्य दुर्देवी आहे. पण त्यांचं व्यक्तव्य मनोरंजक असंच आहे असा पलटवार एकनाथ खडसेंनी केलाय.

विधानसभेच्या रणसंग्रामात 25 वर्षांची सेना आणि भाजपची युती तुटली आणि मोठ्या वादानंतर पुन्हा जुळली. शिवसेना सत्तेत सामील होऊन गुण्यागोविंदाने सार काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र आहे. पण अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. सेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये. 'मुंबई ही मराठी माणसाची आहे. पण, आज मराठी माणूस मुंबईच्या बाहेर नालासोपरा, विरार अशा दूर भागात विखरुला गेलाय. मराठी माणसांना मुंबईत स्वस्त दरात घर मिळायला हवं, पण शासन गरिबांना घरं देत नाही. श्रीमंतांनाच फ्लॅट दिली जातात. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे घेणं बंद करावे असा चपराक 'बाळकडू' सिनेमात मुख्यमंत्र्यांना लगावण्यात आलाय. 'बाळकडू'मधील डायलॉगच्या आधार घेत रामदास कदम यांनीही असाच टोला मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे. भविष्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनीही दोन नंबरचे पैसे घेणे थांबवावे आणि गरिबांना स्वस्त दरात फ्लॅट द्यावे असा टोला कदम यांनी लगावला. तर रामदास कदम यांच्या वक्तव्याचा भाजपचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खरपूस समाचार घेतला. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचं विधान दुर्देवी आहे. परंतु आजपर्यंत कदम यांच्या वक्तव्याची जनता फारशी काही दखल घेत नाही. आणि आम्हीही काही घेतं नाही. त्यामुळे मनोरंजन म्हणून त्याकडे पाहावं. जर पुराव्यानिशी आरोप केले तर त्याला अर्थ आहे. विशेष म्हणजे कदम स्वत: मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आहे. याच भानही त्यांना नाही असा सल्लावजा टोला खडसेंनी लगावला.

....आणि कदमांची सारवासारव

आपल्या या वक्तव्यामुळे गोंधळ उडाल्याचं लक्षात आल्यानंतर रामदास कदम यांनी सारवासारव केली. आपण असं काही म्हटलंच नाही. मी मुख्यमंत्र्यांवर अशी टीका करू शकत नाही. मी स्वत: एक मंत्री आहे, मग मुख्यमंत्र्यांवर टीका कशी करू शकतो ?, बिल्डर लोकं दोन नंबरचा पैसा घेतात असं मला म्हणायचं होतं. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मला मुलाखत द्यायची नव्हती ती बळजबरीने घेतली गेली अशी सारवासारवच कदम यांनी आयबीएन लोकमतकडे केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2015 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close