S M L

मदत बुडाली अंधारात, दुष्काळग्रस्त घोगरेवाडीला निधी नाही !

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2015 07:00 PM IST

osmanabad23 जानेवारी : उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची थट्टा केली गेलीये. ज्या गावांमध्ये केंद्राच्या पथकानं पाहणी केली, तीच गावं मदत मिळणार्‍या गावांच्या यादीतून वगळली गेली आहेत अशी माहिती मिळतेय. घोगरेवाडी या गावात सर्वात कमी पाऊस पडला होता. त्यामुळे तिथे दुष्काळाची तीव्रता सर्वात जास्त आहे, पण तेच गाव यादीतून वगळलं गेलंय. केंद्रीय पथकानं घोगरेवाडीत अंधारात पाहणी केली होती.

केंद्रीय पाहणी पथकाने पाहणी केलेल्या गावांनाच दुष्काळी मदत देण्यापासून वगळण्यात आलंय. विशेष म्हणजे ज्या गावात सर्वात कमी पाऊस पडला आणि दुष्काळाची दाहकता जिथे जास्त आहे, अशा गावांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातल्या घोगरेवाडी गावाची पथकाने पाहणी केली होती. मात्र त्याच गावाला मदतीतून वगळण्यात आलंय. याच गावाची अंधारात पाहणी झाल्यानं खूप टीकाही झाली होती. अनुदानासाठी हे गाव रब्बीत निवडलं गेलंय. असं असतानाही केंद्रीय पथकाची पाहणी करताना जिल्ह्यातील महसूल विभागाकडून खरिपाच्या गावाची पाहणीसाठी निवड करून तिचं गावे केंद्रीय पथकाला दाखवणे आवश्यक होते. मात्र महसूल विभागाने केंद्रीय पथकाला रब्बीची गावे दाखवली व त्यानुसार पथकाने या गावाची पाहणी केली. पथकानं खरचं दुष्काळाची पाहणी केली आहे का? आणि या पथकाच्या अहवालावर आम्हाला मदत मिळणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, या प्रकारावर महसूल अधिकारी बोलायला तयार नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2015 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close