S M L

इचलकरंजीत कॉल हॅकर ताब्यात

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 12:56 PM IST

इचलकरंजीत कॉल हॅकर ताब्यात

call hacking24 जानेवारी : इचलकरंजी शहरात आंतरराष्ट्रीय कॉल्स हॅक करणार्‍या एका कॉलसेंटरवर छापा टाकण्यात आलीये. दिल्लीमधल्या टेलीकम्युनिकेशन च्या विभागाच्या मदतीनं दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केलीये. त्यामुळे इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी संजय नामक या युवकाला एटीएसनं ताब्यात घेतलंय.

इचलकरंजी शहरातल्या आडत पेठ भागात ही कारवाई करण्यात आलीय. विशेष म्हणजे संजय हा इथं साडी सेंटर चालवतो पण त्याचवेळी तो या ठिकाणी कॉल्स हॅकही करत होत याची माहिती एटीएसच्या पथकाला लागल्यावर ही कारवाई करण्यात आलीये. या कॉलसेंटरमधून 100 सीमाकार्डही जप्त करण्यात आली असून यामागं मोठं रॅकेट असल्याचीही चर्चा आहे. या कारवाईमध्ये अनेक यंत्रसामुग्रीही ताब्यात घेण्यात आलीये. पण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close