S M L

मेट्रोचा मेगाब्लॉक सकाळी सातच्या आत !

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 03:06 PM IST

metro-mumbai24 जानेवारी : मुंबईकरांच्या दिमतीत दाखल होऊन वर्ष ही न झालेल्या मेट्रोने मेगाब्लॉक सुरू केलाय. आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक असणार आहे. पण हा मेगाब्लॉक पहाटे 5.30 ते 7.30 या वेळेत असणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाणार्‍या चाकरमान्यांना 7.30 नंतर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

मुंबईतील पहिला वहिल्या घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो रेल्वेचा आज पहिला मेगाब्लॉक पार पडला. आजपासून तीन दिवस मेट्रोचा मेगाब्लॉक सुरू राहणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असा हा तीन दिवसांचा हा मेगाब्लॉक आहे. तीन दिवसांत पहाटे साडे पाच ऐवजी सकाळी साडे सात वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यासाठी हा मेगॉब्लॉक करण्यात येतोय. त्यानंतर 27 जानेवारीपासून मेट्रो पुन्हा पहिल्याप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close