S M L

पुण्यातली विसर्जन मिरवणूक आटोपणार 12 तासांच्या आत

2सप्टेंबरH1N1चा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक फक्त 12 तासांत आटोपण्याचा निर्णय पुण्यातल्या गणपती मंडळांनी घेतला आहे. तसंच मिरवणुकीत गुलालही उधळण्यात येणार नाही. पुण्यातली विसर्जन मिरवणूक म्हणजे ढोल-ताशा पथकांचा जल्लोष असतो. सजवलेले वेगवेगळ्या प्रकारचे रथ हे मिरवणुकीचं वैशिष्ट्य, पण H1N1च्या सावटामुळं अनेक मंडळांनी मिरवणुका साधेपणानं काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दगडूशेठ हलवाई गणेश मंडळानं तब्बल एक लाख दिवे असणारा रथ बनवला होता. पण आता ही मिरवणूक विद्युत रोषणाईशिवाय काढण्यात येणार आहे. ढोल-ताशा पथकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. मानाचा पहिला गणपती असणार्‍या कसबा गणपती मंडळानं मिरवणूक साधेपणानं काढण्याचा निर्णय पहिल्यांदा घेतला होता. त्यापाठोपाठ इतर मंडळांनीही हा निर्णय घेतलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2009 06:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2009 06:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close