S M L

कोल्हापुरच्या मुलाच्या अलाहाबादमध्ये अमानुष छळ

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 09:08 PM IST

कोल्हापुरच्या मुलाच्या अलाहाबादमध्ये अमानुष छळ

kolhapur_allahabad24 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या उदगावच्या एका मुलाचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विशेष म्हणजे हा छळ उत्तरप्रदेशातल्या अलाहाबादमध्ये करण्यात आलाय. या मुलाला बेदम मारहाण करुन त्याच्या अंगावर ऍसिड फेकण्याचाही प्रकार घडलाय.

उदगावमधल्या 16 वर्षीय मुलाला त्याच्या कुटुंबियांनी अलाहाबादमध्ये नातेवाईकांकडं सोनारकाम करण्यासाठी पाठवलं होतं. पण तिथं गेल्यावर या पीडित मुलाला काम करण्याऐवजी त्याला उपाशी ठेवून त्याच्याकडून घरकाम करुन घेतलं जायचं याला मुलानं विरोध केल्यावर त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलीय. तसंच त्याच्या अंगावर ऍसिडही फेकण्यात आलंय. या घटनेमुळे या मुलाचं मानसिक संतूलन बिघडलं असून त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत.पीडित मुलानं स्वतःची सुटका करून तो परत आपल्या गावी परतलाय. दरम्यान, आता याबाबत पीडित मुलाचं कुटुंब अलाहाबादच्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close