S M L

शेतकरी उतरले 60 फूट खोल विहिरीत

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 10:36 PM IST

शेतकरी उतरले 60 फूट खोल विहिरीत

paithan_farmaer24 जानेवारी : विहिरीचं शासकीय अनुदान मिळालं नाही म्हणून पैठणच्या शेतकर्‍यांनी अनोखं आंदोलन सुरू केलंय. शेतकर्‍यांनी चक्क 60 फूट खोल विहिरीत स्वत:ला कोंडून घेतलं आहे. शेतकरी नेते जयाजी सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

आैरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं गेल्या तीन वर्षांपासून शासणानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहिरी खोदण्यास मान्यता दिली. मात्र विहिरी खोदणार्‍या मजुरांचं अनुदान दिलं नाही. पैठणच्या जवळपास 45 गावातील 450 विहिरींचं अनुदान न मिळाल्यानं संतप्त शेतकर्‍यांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलंय. मागणी मान्य होईपर्यंत विहिरीच्या बाहेर येणार नसल्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close