S M L

जशोदाबेन यांची घरवापसी कधी ?, कामतांचा तोल ढळला

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2015 06:58 PM IST

जशोदाबेन यांची घरवापसी कधी ?, कामतांचा तोल ढळला

kamat on modi27 जानेवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांना अजूनही हक्काच घरं मिळालं नाही. भाजपने जो काही घरवापसीचा कार्यक्रम हाती घेतलाय. त्याअगोदर मोदींनी जशोदाबेन यांची घरवापसी करावी असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी केलंय. कामत एवढ्यावर थांबले नाही तर नव्याने आलेल्या स्मृती इराणींनी पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मंत्रिपद आणि सरकारी बंगला दिला जातो मात्र,जशोदाबेन यांना आजही रिक्षाने प्रवास करावा लागतो अशी मुक्ताफळंही कामत यांनी उधळली.

मुंबई काँग्रेसनं मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढलाय. काँग्रेसचे मुंबईचे शहराध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा आझाद मैदानात मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य आंदोलन केलं. आंदोलनाचं रूपांतर नंतर जाहीर सभेत झालं. या सभेनंतर काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी मीडियाशी संवाद साधत असतांना मुक्ताफळं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ते सहा वेळा निवडणूक लढले असतील. पण लोकसभेत जेलमध्ये जाण्याच्या भीतीने पहिल्यांदाच त्यांनी आपल्या पत्नीची जाहीर कबुली दिली. एकीकडे नव्याने आलेल्या स्मृती इराणी यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद आणि सरकारी बंगला दिला जातो. पण त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांना आजही रिक्षाने जावं लागतं. त्यांना पुरावण्यात आलेले सुरक्षारक्षक हे गाड्याने फिरतात. पण, जशोदाबेन यांना रिक्षा आणि बसने प्रवास करावा लागतोय अशी बोचरी टीका कामत यांनी केली. तसंच आज मोदी महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारता पण आपल्या पत्नीला हक्काच घरं देऊ शकत नाही. देशाच्या जनतेला काय संदेश द्यायचाय. भाजपने जो काही घरवापसीचा कार्यक्रम हाती घेतलाय. पहिले मोदींनी आपल्या पत्नी जशोदाबेन यांची घरवापसी करावी असं वादग्रस्त वक्तव्यच कामत यांनी केलं. गुरुदास कामत यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 06:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close