S M L

‘एमडी ड्रग’वर लवकरच बंदी?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 28, 2015 10:16 AM IST

‘एमडी ड्रग’वर लवकरच बंदी?

28 जानेवारी :  शाळकरी आणि कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये 'म्यॅव म्यॅव' आणि 'एम-कॅट' अशा कोड भाषेत 'फेमस' असललेल्या 'एमडी ड्रग' या अंमली पदार्थावर केंद्र सरकारकडून लवकरच बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारनं पाठवलेला 'एम डी' ड्रगवरच्या बंदीबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्र सरकारनं काल(मंगळवारी) मुंबई हायकोर्टात सांगितलं. डॉ. युसूफ मर्चंट यांनी हायकोर्टात यासंबंधीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्रानं एमडी ड्रग्जवर एनडीपीस कायद्याअंतर्गत बंदी विचाराधीन असल्याचं सांगितलं.

'मेफेड्रोन' असे अधिकृत नाव असलेला हा अंमलीपदार्थ 150-500 रुपये प्रती ग्रॅम दराने वेबसाइटच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे. बबल्स, म्यॅव म्यॅव, एम-कॅट अशा वेगवेगळ्या कोड नावांनी एम डी ड्रग ओळखला जातो. तरुण वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. परंतु, अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखालील पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश होत नसल्याने संबंधितांवर कारवाई होत नसल्याचे या जनहित याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले आहे.

जगभरातल्या तब्बल 53 देशांमध्ये या ड्रग्जवर बंदी घालण्यात आलेली आहे. पण भारतात त्यावर बंदी नसल्याने हे ड्रग्ज सर्वत्र अगदी सहज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे शाळा आणि कॉलेजांबाहेर ते मोठ्या प्रमाणात विकले जातात. या गोष्टीचं गंभीर्य लक्षात घेता त्यावर तात्काळ बंदीची मागणी होत आहे. हायकोर्टात या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2015 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close