S M L

मिशेल ओबामांनी स्कार्फ घेतला नाही म्हणून सौदीत वाद

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2015 08:21 PM IST

मिशेल ओबामांनी स्कार्फ घेतला नाही म्हणून सौदीत वाद

 28 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या पोशाखावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलंय. सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असताना तेथील सरकारी चॅनेलनं मिशेल ओबामा यांना अंधूक (ब्लर) केलं होतं. मिशेल ओबामांनी बुरखा घातला नाही आणि डोकंही झाकलं नव्हतं म्हणून हा वाद पेटला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी भारताचा दौरा आटोपून सौदी अरेबियाला गेले होते. ओबामा आणि मिशेल ओबामा सौदीचे नवीन राजे सलमान बशीर यांची भेट घेत असताना सौदी अरेबियाच्या सरकारी चॅनेलनं मिशेल ओबामा यांना अंधूक केलं होतं त्यावरुन हा वाद निर्माण झालाय. पण सौदी अरेबियानं या बातमीचं खंडन केलंय. या भेटी दरम्यान, मिशेल ओबामांनी बुरखा घातला नव्हता किंवा डोकंही झाकलं नव्हतं. सोशल मीडियावरुन ही बातमी पसरली. त्याचे पडसाद उमटले असून अमेरिकन सरकारने यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे, इंडोनेशियातील भेटीदरम्यान मिशेल ओबामांनी डोक्यावरुन स्कार्फ घेतला होता. पण रियाध भेटीदरम्यान त्यांचा पोशाख वेगळा होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2015 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close