S M L

मिरजला जाण्यासाठी नेत्यांचा आग्रह : भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस

7 सप्टेंबर मिरज-सांगलीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना तिथे निघालेल्या भाजप नेते गोपीनाथ मुंंडेंना पोलिसांची मुंबई एअरपोर्टवरच अडवलं. याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी एअरपोर्टवर जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तसंच पोलिसांना धक्काबुक्की करत या कार्यकर्त्यांनी एअरपोर्टमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मुंबई एअरपोर्टवर भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. तर दुसरीकडं ''काहीही झालं तरी, आपण सांगलीला जाणारच'' असा निश्चय गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. सांगलीला जाण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं गोपिनाथ मुंडे यांनी आयबीएन - लोकमतशी बोलतांना सांगितलं आहे. शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या सोमवारी सकाळी सांगलीत गेल्या होत्या. गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ज्या मंडळांनी घेतली आहे, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं नीलम गोर्‍हे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि परशुराम उपरकर यांनाही पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2009 08:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2009 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close