S M L

जिहादसाठी नकार दिला म्हणून युवकाला बेदम मारहाण

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 10:11 AM IST

जिहादसाठी नकार दिला म्हणून युवकाला बेदम मारहाण

28 जानेवारी : जिहादसाठी नकार दिला म्हणून एका मोहम्मद शेख या युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा भागात घडलीये. युवकाला मारहाणीनंतर त्याच्या घराची आणि गाडीचीही तोडफोड करण्यात आलीये. मोहम्मदला दोन दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या प्रकारची मुंब्रा पोलीस ठाण्यात फक्त अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली.

अल्पसंख्यांक बहुल अशा मुंब्य्रात वातावरण खराब झालंय कारण आहे असामाजिक तत्वांच्या लोकांचा वावर आणि पोलिसांचे दुर्लक्ष. एमडी आणि गुन्हेगारी वाढत असतानाच जिहादसाठी नकार देणार्‍या मोहम्मद शेख या युवकाला गंभीर मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर या युवकाच्या घराची कार्यालयाची आणि गाडीचीही मौलवी आणि त्यांच्या लोकांनी तोडफोड केलीय हा धक्कादायक प्रकार सुरू असताना या कुटुंबाच्या मदतीला कोणीही तयार नाहीये. एवढं गंभीर प्रकरण असताना मुंब्रा पोलीस फक्त अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली. जखमी युवक आणि त्याचे कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात जगत असून न्यायाची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी कल्याणमधील चार तरूण जिहादसाठी इराकमधील आयसीस संघटनेत सहभागी झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2015 11:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close