S M L

अण्णा मोदी सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत

Samruddha Bhambure | Updated On: Jan 29, 2015 01:15 PM IST

अण्णा मोदी सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत

29 जानेवारी : पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असून, निवडणूक प्रचारात घोषित केलेल्या काळ्या पैशांचे काय झाले, असा थेट सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले आहे.

राळेगणसिद्धीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करत भ्रष्टाचार, सक्षम लोकपाल, शेतकरीविरोधी कायदे आणि काळा पैसा, या विषयांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला.

लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून वर्ष लोटले आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांना दोनदा आठवण करून दिली. त्यांनी मात्र, काहीच हालचाल केल्याचे दिसत नाही. सरकारच्या या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगत अण्णा म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने जनतेची फसवणूक केल्याने जनतेला बदल हवा होता. त्यानंतर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या, ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याला प्राधान्य देतील असे वाटले होते. पण मोदी यांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असून, ते केवळ बोलतात कृती काहीच करत नाही, असा टोला अण्णांनी मोदी सरकारला लगावला आहे.

मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत आणि परदेशातील काळा पैसा देशात आणला जाईल, काळा पैसा परत आणल्यानंतर प्रत्येक देशवासीयांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे आश्वासन दिले होते. मात्र, आजवर 15 रुपयेही मिळालेले नाहीत. मोदी यांनी काळा पैसा तर आणला नाहीच पण सक्षम लोकपाल कायदा होण्याबाबतही कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्याचबरोबर, सरकारचा भूसंपादन कायदा हा शेतकर्‍यांच्या हिताविरुद्ध असल्याचं सांगत अण्णांनी या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी पुन्हा एकदा 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे.

दरम्यान, अण्णांनी भाजपच्या किरण बेदी आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांच्याबाबत वक्तव्य करण्यास नकार दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close