S M L

पुढच्या वर्षी टी -20 वर्ल्ड कप भारतात, 11 मार्च ते 3 एप्रिल रंगणार सामने !

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 04:42 PM IST

पुढच्या वर्षी टी -20 वर्ल्ड कप भारतात, 11 मार्च ते 3 एप्रिल रंगणार सामने !

icc worldcup 201628 जानेवारी : पुढच्या वर्षी आयसीसी टी -20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 11 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान या वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहे. बुधवारी आयसीसीची या वर्षातली पहिली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दुबईत आयसीसीची पहिली बैठक पार पडली या बैठकी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतात 2023 मध्ये आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा यजमान असणार आहे. तसंच या वर्षी वन डे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये होणार आहे. तर 2019 मध्ये याची जबाबदारी इंग्लंडवर असणार आहे. टी -20 वर्ल्डकप 2016 साठी क्वालाईफाईंग टूर्नामेंट 6 ते 26 जुलै दरम्यान आयरलँड आणि स्कॉटलँड येथे आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये सुपर ओव्हरचाही उपयोग करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आयसीसीने घेतलाय.

आयसीसीच्या बैठकीतले महत्वाचे निर्णय

- 1 जून ते 19 जून दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये इंग्लंडमध्ये होईल

- 2017 मध्ये इंग्लंडमध्ये 4 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान आयसीसी महिला वर्ल्ड कपचं आयोजन

-  अंडर-19 वर्ल्ड 2018  न्यूझीलंडमध्ये  आयोजित, 12 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2018 दरम्यान ही स्पर्धा होईल

- 2 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर महिला टी-20 वर्ल्ड कप, 2018 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये

- 30 मे ते 15 जुलै दरम्यान आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होईल

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close