S M L

महाराष्ट्राची वारीच 'लय भारी', पटकावला पहिला क्रमांक

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 06:01 PM IST

mahawari banner29 जानेवारी : टाळ,मृदंगाचा गजर, अन् 'माऊली...माऊली' गाण्यावर ठेका धरत महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचं दर्शन घडवणारी पंढरपूरची वारी 'लय भारी' ठरलीये. प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामिल झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावलाय.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत असतात. यावर्षी संचलनात एकूण 25 चित्ररथांनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्राच्या वारीच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला. तर त्यापाठोपाठ झारखंडच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळालाय. कर्नाटकच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अखंड भारताच्या संस्कृती, परंपरेचं दर्शन घडलं. विशेष म्हणजे या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सहपत्नीक उपस्थित होते. त्यामुळे या सोहळ्याला वेगळं महत्व प्राप्त झालं होतं. महाराष्ट्राने यावेळी आपल्या चित्ररथातून वारकरी परंपरा साकारली. टाळ मृदंगाचा नाद, आणि संगीतकार अजय-अतुल यांनी लयबद्ध केलेलं 'लय भारी' सिनेमातील 'माऊली माऊली' गाण्याचा ठेका धरत मोठ्या दिमाखात महाराष्ट्राचा चित्ररथ सादर झाला. या चित्ररथासोबतच 'उदे ग अंबे उदे'चा ठेका धरत गोंधळ आणि लेझीमने उपस्थितांची मनं जिंकली. विशेष म्हणजे 2011 साली प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राची मराठमोठी लावणी सादर झाली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close