S M L

दूषित रक्तातून एक हजार जणांना एचआयव्हीची लागण

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 06:43 PM IST

दूषित रक्तातून एक हजार जणांना एचआयव्हीची लागण

hiv blood29 जानेवारी : 'रक्तदान हे श्रेष्ठदान' असं म्हणून आपण रक्तदानाचं कर्तृव्य पार पाडतो. पण आपल्या पेशंटसाठी रक्त घ्यायची वेळ आली आणि ते रक्त एचआयव्ही बाधीत असलं तर...! दचकू नका, कारण गेल्या पाच वर्षात राज्यात तब्बल एक हजार लोक दूषित रक्त चढवल्याने एचआयव्ही बाधीत झाले आहेत तर देशभरात अशा तब्बल 8 हजार 983 जणांना लागण झाल्याची धक्कायक माहिती उघडकीस आलीये.

एड्स सारखा महाभयंकर आजाराचा अवघ्या जगाला विळखा बसलाय. एड्सच्या विषाणूंचं संक्रमण होऊ नये यासाठी देशभरात मोठ मोठे अभियान राबवले गेले. राज्यभरात कोट्यवधीचा खर्च करून जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्यात. एड्सच्या विषाणूंचं संक्रमण होऊ नये यासाठी रक्तपेढ्यांना कडक नियम लागू करण्यात आले.

पण एवढी खबरदारी घेऊनही देशभरात तब्बल 8 हजार 983 जणांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याची बाब उजेडात आलीये. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेनंच, माहिती अधिकारांतर्गत हा आकडा जाहीर केला आहे. त्यापैकी 1 हजार रुग्ण महाराष्ट्रातील आहे.

रक्तातून एचआयव्हीच्या संक्रमणात गुजरात आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र तिसर्‍या स्थानावर आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यात 80 एचआयव्ही केसेस उघडकीला आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला एकच हादरा बसला असून चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close