S M L

मिरजमध्ये कर्फ्यू मंगळवारपर्यंत वाढवला

7 सप्टेंबरतणावग्रस्त मिरजमधला कर्फ्यू पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वाढवला आहे. मिरजेतला कर्फ्यू सकाळी 10 ते 11.30 या काळात शिथिल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. ज्या मंडळांनी गणेश विसर्जनाची तयारी दाखवली आहे, त्यांना मिरजेत कर्फ्यू असूनही विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. मिरज शहरात गणेशोत्सवातल्या कमानीमुळे वाद निर्माण झाला होता. तिथे शुक्रवारपासून तणावाचं वातावरण आहे. अजूनही 150 पेक्षा जास्त मंडळांनी गणपती विसर्जन केलेलं नाही. मिरजेतले पडसाद सांगली, तासगावसह कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. इचलकरंजी अजून बंद आहे. तर कोल्हापुरात जनजीवन सुरळीत झालं आहे. दरम्यान सांगलीमध्ये शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर दिवाकर रावते आणि परशुराम उपरकर यांनीही ताब्यात घेतलं आहे. भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांना विमानाने कोल्हापूरला जाण्यास परवानगी न दिल्याने ते गाडीने सांगलीच्या दिशेने रवाना झालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2009 11:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2009 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close