S M L

कल्याण-डोंबिवली पालिकेचे 13 कर्मचारी निलंबित

Samruddha Bhambure | Updated On: Jan 30, 2015 01:16 PM IST

kdmc_worker

30  जानेवारी : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गायिका आणि नर्तिकांवर नोटांची बरसात करणार्‍या 11 कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने आयोजित नाचगाण्यांच्या कार्यक्रमात महापालिका कर्मचार्‍यांनी धुंद होऊन गायिका आणि नृत्यांगनांवर नोटांची उधळण केली. या प्रकरणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने आयुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. IBN लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करत संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2015 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close