S M L

बेस्ट प्रवास उद्यापासून महागणार, किमान भाडे 7 रुपये

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 02:12 PM IST

Image img_200192_bestbus_240x180.jpg31 जानेवारी : मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री बसणार आहे. मेट्रोपाठोपाठ आता बेस्ट बसच्या भाड्यात उद्यापासून पुन्हा एकदा वाढ होणार आहे. उद्यापासून साध्या बससाठी दोन किलोमीटर किंवा त्याच्या आतल्या प्रवासाला 7 रूपये तर 4 किलोमीटरच्या प्रवासासाठी 10 रूपये मोजावे लागणार आहेत.

फेब्रुवारी आणि एप्रिल अशी दोनदा भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनं मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात ही भाडेवाढ होणार असून प्रत्येकी 1 रुपयाने भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे किमान भाड्यासाठी आता सहा रुपये मोजावे लागणार आहे. तर एसी बससाठी 2 किमीचं भाडं 25 रूपये तर 4 किमीचं भांड 35 रूपये आणि 6 किमीचं भाडं 50 रूपये असं असेल. बेस्ट तोट्यात असल्यानं दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आला याचा बोजा थेट प्रवाशांवरच पडणार आहे.

अशी असेल बेस्टची दरवाढ

- 2 किमी ला 7 रूपये

- 4 किमी ला 10 रूपये

- 6 किमीला 13 रूपये

- 10 किमीला 16 रूपये

- 14 किमीला 20 रूपये

- 20 किमीला 25 रूपये

- 30 किमीला 30 रूपये

- 40 किमीला 40 रूपये

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close