S M L

मिरज-सांगलीत संचारबंदी : जीवनावश्यक वस्तू महागल्या

8 सप्टेंबर लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी याासाठी सांगलीतली संचारबंदी सकाळी 10 ते 12 या दोन तासांसाठी शिथिल करण्यात आली होती. सांगली शहरात दोन तासंाच्या शिथिलतेनंतर संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे. तर मिरजेतल्या तणावाचा आढावा घेतल्यावर दुपारी 2 ते 6 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. पण पुन्हा 6 नंतर संचारबंदी अनिश्चित काळासाठी लावण्यात आली.शहारात सध्या तणावपूर्ण शांतता असून काळाबाजार होऊ नये म्हणून सरकार विशेष प्रयत्न करतय. सांगली, मिरजमधल्या संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. घरातला भाजीपाला, दूध, किराणा सामान आदी अत्यावश्यक वस्तू संपल्याने संचारबंदी दोन तास शिथिल केल्यानं नागरिकांची या वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पण व्यापारी त्यांची अडवणूक करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाला 80 रुपये किलो, दूध 50 रुपये लीटर, डाळींबासारखी फळं 100 रुपये किलो अशा वाढलेल्या भावांमुळं नागरिक प्रचंड संतापलेत. प्रशासनानं यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी कलेक्टरकडे केली आहे. दरम्यान, तासगावजवळ मणेराजुरी या गावात दगडफेकीचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2009 09:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2009 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close