S M L

महापौर तृप्ती माळवींना कोणत्याही क्षणी अटक

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 10:25 PM IST

महापौर तृप्ती माळवींना कोणत्याही क्षणी अटक

trupti malvi3431 जानेवारी : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडल्यामुळे माळवी यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. माळवी यांना डिस्चार्ज दिल्यानंतर अटक करण्यात येईल अशी माहिती एसीबीचे अधिक्षक दिगंबर प्रधान यांनी दिलीये.

कोल्हापूरच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. शुक्रवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास महापालिकेमध्ये महापौर दालनामध्येच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केलीय. शहरातल्या शिवाजी पेठ परिसरातल्या एका नागरिकाची जमीन रस्ता तयार करताना संपादित करण्यात आली होती. या जागेवरंच आरक्षण उठवण्यासाठी महापौरांचा पीए अश्विन गडकरी याने 40 हजार रुपयांची मागणी केली होती. हा प्रकार संबंधित नागरिकांनं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्यांने एसीबीशी संपर्क साधून 16 हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरवला होता. त्यावेळी ही कारवाई कऱण्यात आलीय. या प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांची एसीबीच्या अधिकार्‍यांनी कसून चौकशी सुरू केलीय पण अजूनही त्यांाना अटक करण्यात आलेली नाही. तर त्यांचा पीए अश्विन गडकरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचीही चौकशी सुरु आह. दरम्यान, माळवी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पीएचीही चौकशी सुरू आहे त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आलाय. हा गुन्हा सिद्ध झाल्यास 2 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close