S M L

सेरेना विल्यम्सने पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 08:48 PM IST

सेरेना विल्यम्सने पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद

serena31 जानेवारी : सेरेनानं मारिया शारापोव्हावर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावलंय. सेरेनाचं हे सहावं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद आहे. सेरेनाच्या खात्यात आता 19 ग्रँडस्लॅम जमा झाले आहेत.

सेरेनाचा हा विजय जल्लोष सगळं काही सांगून जातो...दुखापत, फॉर्म या सगळ्यांवर मात करत सेरेनानं पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपनवर आपलं नाव कोरलं. फायनलला सुरूवात झाली तेव्हा शारापोव्हा दबावात वाटत होती. आणि त्याचा फायदाही सेरेनानं सुरुवातीला घेतला. त्यानंतर शारापोव्हानही सेरेनाला प्रत्युत्तर दिलं. पण सेरेनाच्या धडाक्यापुढे तिचा टिकाव लागला नाही. आणि अवघ्या 47 मिनिटांत सेरेनानं पहिला सेट घेतला. पुन्हा एकदा एकतर्फी मॅच होईलं असं वाटत असताना...शारापोव्हानं दुसर्‍या सेटमध्ये प्रतिकार केला आणि टाय ब्रेकरपर्यंत मॅच नेली. पण सेरेनानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देत. जबरदस्त सर्व्हिससह सेट आणि अजिंक्यपद पटकावलं.

शारापोव्हाला इतिहास बदलता आला नाही. पण तीनं आव्हानं मात्र नक्की निर्माण केलं.

सेरेना विल्यम्सच हे 6 वं ऑस्ट्रेलियन ओपन अजिंक्यपद...आणि शारापोव्हा विरुद्ध सोळावा विजय होता. ग्रँडस्लॅमच्या स्पर्धेत तीनी मार्टिना नवरातोलोवाला मागे टाकलंय. सेरेनाच्या खात्यात आता 19 ग्रँडस्लॅम जमा झालेत. आता टार्गेट असेलं ते स्टेफी ग्राफचं 22 ग्रँडस्लॅमचा रेकॉर्ड तोडने.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 08:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close