S M L

'बेस्ट' प्रवास महागला!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2015 02:48 PM IST

BEST-buses

01 फेब्रुवारी :   तिकीट दरवाढ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कोणताही प्रयत्न न झाल्याने आज, रविवारपासून मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास महाग झाला आहे. बस भाड्यात एक ते दहा रुपयांची वाढ करण्यात आली असून बसचं किमान भाडं सात रुपये झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बेस्टची भाडेवाढ आज अखेर लागू करण्यात आली.

बेस्ट परिवहन विभागाने बसच्या साध्या तिकीट, मासिक, त्रैमासिक पास, वातानुकूलीत तिकीट दरात वाढ केली आहे.बेस्ट परिवहन विभागाने बसचे किमान तिकिट 6 रूपयांवरून आता 7 रूपये केले आहे. तोट्यात असलेल्या बेस्टला राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

आजपासून लागू झालेल्या दरवाढीमुळं प्रवासी हैराण झालेले असतानाच पुन्हा दोन महिन्यांनंतर म्हणजेच, 1 एप्रिलपासून भाडेवाढ होणार आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2015 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close