S M L

परभणीत एका घरात स्फोट झाल्याने प्राध्यापकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2015 08:42 PM IST

परभणीत एका घरात स्फोट झाल्याने प्राध्यापकाचा मृत्यू

01 फेब्रुवारी :   परभणीमध्ये आनंदनगर भागात आज (रविवारी) एका खोलीत स्फोट झाला असून त्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी सव्वादहा वाजता ही घटना घडली असून हा स्फोट नक्की कशामुळे झाला, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आनंदनगरमध्ये अमोल वाघमारे व अतुल वाघमारे हे जुळे भाऊ एका भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांनी ही खोली निवृत्त प्राध्यापक करंजकर यांकडून भाड्याने घेतली होती. आज (रविवारी) सकाळी ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी अमोल वाघमारेचा भाऊ अतुल वाघमारे खोलीत एकटाच होता. स्फोट झाल्यानंतर खिडकीच्या काचा फुटल्या, तसंच घरातले सामानही बाहेर फेकले गेले, छतालाही नुकसान झालं आहे.

अतुल वाघमारे हे आंबेजोगाई येथे योगेश्वरी पोलिटेक्निक कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून उद्या एटीएस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळाचा आढावा घेणार आहेत. रसायनांमुळे हा स्फोट झाला आहे का यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2015 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close