S M L

ओझर विमानतळावर अधिकार्‍यांची 'ओली' पार्टी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2015 09:17 AM IST

ओझर विमानतळावर अधिकार्‍यांची 'ओली' पार्टी

02 फेब्रुवारी :  नाशिकमधील ओझर विमानतळाचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दारु पार्टीसाठी केल्याचे प्रताप उघडकीस आला आहे. ओझर विमानतळ हा संरक्षण विभागाचा असून संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असा विभाग आहे. मात्र, याच ठिकाणी ही ओली पार्टी झाल्याने खळबळ माजली आहे.

लवकरच सुरू होणार्‍या ओझर विमानतळावर शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत कर्कश डिजेचा आवाज आणि मद्यपानासह महिलांच्या नाचगाण्याचाही कार्यक्रम रंगल्याचे सांगितलं जात आहे. सार्वजनिक बांधकामच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता निवृत्त झाल्यानिमित्त विमानतळावर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांकडून शासकीय परवानगी घेऊन कार्यक्रम होत असल्याचे सांगण्यात आले. मग गस्तीवर असलेल्या जानोरी गावच्या संरपंचांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर हा ओल्या पार्टीचा प्रताप उघड झाला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळाची पाहाणी केली असता दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसला. या प्रकरणाची केंद्रीय संरक्षण मंत्रायलाकडे तक्रार करणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close