S M L

शरद पवार पुन्हा उतरणार बीसीसीआयच्या रिंगणात ?

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 05:41 PM IST

sharad pawar MCA02 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा बीसीसीआयच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यामुळे, शरद पवारांची संधी वाढलीये.

राजकारणाच्या पटलावर आपला दबदबा निर्माण करणारे शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरही 'इनिंग' पेश केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार नव्याने इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी ईस्ट झोनचा अध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे. एन.श्रीनिवासन यांची ईस्ट झोनवर चांगली पकड आहे. पण त्यांनी माघार घेतल्यास शरद पवार पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. याअगोदर शरद पवार यांनी बीसीसीआयचं 2005 ते 2008 दरम्यान अध्यक्षपद भूषवलंय. सध्या ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close