S M L

अवघ्या 19 वर्षांचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवारचा हॉर्ट ऍटॅकने मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 06:01 PM IST

अवघ्या 19 वर्षांचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवारचा हॉर्ट ऍटॅकने मृत्यू

mayurosh pawar302 फेब्रुवारी : महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवार याचा तिरुवनंतपुरममध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झालाय. मयुरेश अवघ्या 19 वर्षांचा होता. त्याच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होतं आहे.

मयुरेश पवार हा नॅशनल गेम्समध्ये भाग घेण्यासाठी तिरुवनंतपुरमला गेला होता. सकाळी हॅन्डबॉलची मॅच झाली होती. या मॅचमध्ये महाराष्ट्राच्या टीमचा पराभव झाला. या सामन्यानंतर मयुरेश आणि त्याचे मित्र मैदानावर फोटो काढत होते. फोटो काढत असताना, अचानक मयुरेश मैदानावर कोसळला. मयुरेशला तातडीने ऍम्बुलन्सने एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेत पुन्हा दुसरा ह्रदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या अगोदरच मयुरेशचा मृत्यू झाला. मयुरेशचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं त्यात तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं निष्पन्न झालं अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पथकप्रमुख धनंजय भोसले यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close